ऐन दसऱ्याला ऐनपुर येथे सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही

0

ऐनपुर ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऐनपुर येथे बारीघाट परिसरात वास्तव्यास राहणाऱ्या सुशिलाबाई जगन्नाथ बारी (वय ६५) यांच्या राहत्या घरी सकाळी 7:30 च्या सुमारास घरगुती सिलिंडर गैसचा स्फोट होऊन घरगुती वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील ऐनपुर येथील बारीघाट परिसरात राहणाऱ्या सुशीलाबाई बारी या मोलमजूरी करणाऱ्या महिला आपल्या मूलगा सुन आणि नातवंडांसह राहतात यांच्या राहत्या घरात ऐन सनासुदीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीच अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन घरगुती वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

यात रोख रक्कमेसह, इलेक्ट्रिक वस्तु मिक्सर, सीलिंग फैन, टेबल फैन, घरातील गहु,ज्वारी सारखी बरेचशे अन्नधान्य, घरावरील पत्रे, कपाट तसेच संसारोपयोगी अत्यावश्यक वस्तुंचे नुकसान झालेले आहे.

घटनास्थळी अधिकाऱ्यांची भेट

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रावेर तहसीलदार देवगुणे मॅडम,मंडल अधिकारी शेलकर अप्पा,तलाठी शिरसाठ यांनी पाहनी करुन पंचनामा केला.

गरीब कुटुंबाचे ऐन दसऱ्याला संसार उघड़यावर

बारीघाट परिसरात राहणारे सुशिलाबाई बारीचे कुटुंब मोलमजूरी करणारे असून गरीब कुटुंबाचा संसार उघड़यावर आलेला आहे तरी सदर कुटुंबाला शासनाकड़ून लवकरात लवकर मदत व्हावी अशी अपेक्षा कुटुंबाकडुन केली जात आहे तसेच झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी मदतीसाठी आर्त हाक लावत आहे.

आमदार चंद्रकांत पाटील, सरपंचांसह ग्रामस्थ आले मदतीला धावून

सिलिंडर स्फोटाची बातमी कळताच आमदार चंद्रकांत पाटील,यांनी तात्काळ मदत करण्याचे आश्वासन दिले त्यावेळी सरपंच अमोल महाजन,सुनील महाजन, अनिल जैतकर,अरविंद महाजन,रविन्द्र महाजन, नीलेश महाजन,मायाताई बारी,तसेच गावातील ग्रामस्थ मदतीला धाउन आले.तसेच सुनील शिवराम महाजन यांच्या सहीत ग्रामस्थानी आर्थिक स्वरुपात मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.