“एसडी-सीड अभ्यासिका” १ सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांच्या सेवेत

0

जळगाव :  एसडी-सीडचे आधारस्तंभ माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन यांच्या प्रेरणेने एसडी-सीड मागील दहा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात जे जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे आणि जागतिक पातळीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावे  हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम अविरतपणे राबविले जात आहेत.

आता पर्यंत सुमारे १२५०० विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असून एकूण ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. २८,००० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे.

ग्रामीण व शहरी भागातील दहावी, जुनिअर, महाविद्यालयीन व  सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने एसडी-सीड अभ्यासिका केंद्र सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालय, प्रताप नगर, रिंग रोड, जळगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेत येत आहे.

एसडी-सीड अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वच्छ आणि संपूर्ण शांत प्रसन्न वातावरण, भरपूर उजेड, स्वतंत्र आरामदायी बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहेत.

एसडी-सीड अभ्यासिका प्रवेश पद्धती :

एसडी-सीड अभ्यासिकेसाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज भरून अभ्यासिकेच्या कार्यालयात जमा करून प्रवेश निश्चित करावयाचा आहे. प्रवेश संख्या मर्यादित आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचे नियम व अटी यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. अधिक माहितीसाठी एसडी-सीड अभ्यासिका, सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालय, प्रताप नगर, रिंग रोड, जळगाव येथे प्रत्यक्ष किंवा ०२५७- २२३४२५८ किंवा ७५०७७७८५९२ या क्रमांकावर संपर्क करावा.

अभ्यासिका वेळ : 

सकाळी ८ ते रात्री ९ वा.  या वेळेत दोन  बॅचेस मध्ये प्रवेश उपलब्ध असेल. पहिली बॅच सकाळी ८ ते दु. २ , दुसरी बॅच दु. २ ते रात्री ९ अशी असेल. विद्यार्थी त्यांना योग्य वेळेत प्रवेश निश्चित करू शकतात.

अभ्यासिके करिता इच्छुक संवेदनशील सेवाभावी व्यक्ती संपर्क साधून या कार्यात आपला सक्रीय सहभाग नोंदवू शकतात.

तरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त विद्यार्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख सौ. रत्नाभाभी जैन, कार्यध्यक्षा मीनाक्षी जैन आणि गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.