सेवाभाव हा माझा स्थायीभाव : ना.गिरीष महाजन

0

जामनेरला शैक्षणीक कार्यक्रमात आबाजी पाटील यांचा गौरव

जामनेर –

राज्याचा मंत्री असलो तरी मंत्र्यासारखा बडेजाव आवडत नाही. रस्त्यावर झालेला अपघात पाहुन त्यांना मदत केल्याशिवाय राहवत नाही. सेवाधर्म हाच माझा स्थायी भाव अाहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारी केले.
जामनेर तालुका एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आ. आबाजी नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त न्यु इंग्लिश स्कुलमध्ये झालेल्या कार्यक्रमात महाजन बोलत होते.
मंत्री महाजन यांनी आबाजी पाटील यांचा व नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सौ. पाटील यांचा सत्कार केला. व्यासपिठावर संस्थेचे माजी सचीव नारायण महाजन होते. प्राचार्य डॉ.व्ही.व्ही.भास्कर व शाळेचे पर्यवेक्षक व्ही.डी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
महाजन यांनी सांगितले की, माझेवर या शाळेचे संस्कार झाले. राजकारणाचे धडे महाविद्यालयीन जिवनात येथुनच मिळाले. आबाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. मध्यंतरी वादामुळे विकास खुंटला. संस्थेच्या आवारात कधीही राजकारण केले नाही.
पक्षाने धुळे महानगरपालिकेची जबाबदारी सोपविली असुन त्याठिकाणी देखील यश निश्चीत मिळेल असा विश्वास त्यांनी वव्यक्त केला.
दरम्यान, पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त कला, वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थीनीमसाठी रुबेला लसीकरण शिबीर घेण्यात आले. प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. भास्कर, संचालक दिलीप महाजन यांचेसह शिक्षक, विद्यार्थीनी उपस्थीत होते.
पाटील यांचा सर्व शाळा, महाविद्यालयांच्या प्रमुखांनी सत्कार केला. यावेळी संचालक बाबुराव पाटील, दिलीप महाजन, जितेंद्र पाटील, दिपक पाटील, विजय पाटील यांचेसह शिक्षक, कर्मचारी उपस्थीत होते. संचलन प्रा. सुधीर साठे यांनी केले. आभार मुख्याध्यापक बी.आर.चौधरी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.