एसटी आगार कर्मचाऱ्यांकडून रक्तदान शिबीर संपन्न

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगार  कर्मचाऱ्यांकडुन महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाने एस. टी. महामंडळाचे विलगीकरण करावे तसेच महागाई भत्ता घरभाडे व इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर बसलेले आहेत. संपाचा आज दहावा दिवस असुन त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

मागील काही काळात कित्येक एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांना श्रद्धांजली म्हणून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या सुरूवातीला भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराला प्रारंभ करण्यात आला. जळगाव येथील केशव स्म्रुती प्रतिष्ठान संचलित प. पु माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र यांच्या सहकार्याने या महारक्तदान शिबिरातील रक्त संकलन झालेल्या पिशव्या संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले.

सुमारे ६० रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला.  त्यांना माधवराव गोळवलकर स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने रक्तदान प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले. एस. टी. कर्मचाऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्त दात्याना अल्पोपाहार म्हणून शेंगदाणा चिक्की व चहा बिस्किटे देण्यात आली. सदर या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जामनेर परीवहन मंडळाच्या आगारातील कर्मचाऱ्यांनी विशेष अनमोल सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.