एरंडोल येथे सुखकर्ता फाउंडेशन व नगरपालिकेतर्फे मोफत तपासणी

0

एरंडोल (प्रतिनिधी) : नगरपालिका व सुखकर्ता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दाट वस्ती असलेल्या भीमनगर (केवडीपुरा ) येथील नागरिकांची कोरोना आजाराची सुरुवातीची चिन्हे व त्याची शंका दर्शविणाऱ्या शरीरातील तापमान ,नाडीचे ठोके व शरीरातील प्राणवायूचे प्रमाण यांची तपासणी इन्फ्रारेड थर्मामीटर व पल्स ऑक्षीमिटरने करण्यात आली.

त्याचप्रमाणे यावेळी अंतर पाळणे,हात धुणे,मास्क वापरणे ,सार्वजनिक ठिकाणी न थुंकन्याबाबत व बाहेरगावाहुन आलेल्यांची नावे प्रशासनाला कळविणे बाबत जनजागृती करण्यात आली.सदर उपक्रमासाठी भीमंनगर मित्र मंडळ,संतोष मोरे यांनी परिश्रम घेतले.

यावेळी 125 पुरुष, महिला,आबालवृद्ध यांनी या चाचणी व शिबिराचा लाभ घेतला. तर लोकनियूक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी ,मुख्याधिकारी किरण देशमुख ,डॉ.भट ,कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ ,आरोग्य निरीक्षक अनिल महाजन यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.