एरंडोल येथे नवीन वसाहतीत भल्या पहाटे दोन ठिकाणी चोरी

0

एरंडोल प्रतिनिधी :-


एरंडोल येथे रविवारी भल्या पहाटे लक्ष्मीनगरात अँड.तुषार पाटील यांच्याकडेव साईनगरात गौरव ढोमने यांच्याकडे अज्ञात चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने मिळुन एकुण 4 लाख 60 हजार रु. चा ऐवज लंपास करून पोबारा केला. एका रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे नवीन कॉलन्या मधील रहिवाशी मध्ये घबराट पसरली आहे. व खळबळ माजली आहे.
एरंडोल पो. स्टे. सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल येथे लक्ष्मीनगरात अँड. तुषार पाटील यांच्या घराचे खिडकी चे ग्रील काढून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरात सर्वजण झोपलेले असतांना चोरट्यांनी कपाटातील 20 हजार रुपयांची रोकड व 1 लाख 80 हजार रु. किंमतीचा 60 ग्रॅम सोन्याचा राणी हार ,18 हजार रु. किंमतीचे 6 ग्रॅम सोन्याचे झुंबर , 1 लाख 20 हजार रु. किंमतीची 40 ग्रॅम सोन्याची मंगलपोत 21 हजार रु. किंमतीची 7 ग्रॅम सोन्याची अंगठी, 30 हजार रु. किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याच्या लहान मुलांच्या अंगठ्या या प्रमाणे एकुण 3 लाख 89 रु किंमतीचा माल लंपास करुन धुम ठोकली.
तत्पूर्वी वकिलांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढत असतांना त्यांना जाग आली. व त्यांनी आरोळी मारली असता अँड. पाटील जागे झाले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला अंडर पॅन्ट व बनियान परिधान केलेला व हातात चाकू धरलेला समोर दिसला. मी वकील आहे. मी तुला सोडणार नाही. असे अँड. पाटील यांनी सांगितले असता पप्पा लवकर पो. स्टे. ला कळवा असे त्यांच्या सहा वर्षीय मुलगा अजिंक्य याने वकीलांना सांगितले. त्यावेळी शेजारी संदीप पवार व देशमुख जागे झाले व धावत आले. दरम्यान घरातील तीन चोर व बाहेर पहारा करणारे चोर हे पसार झाले. या आधी साईनगरात चोरट्यांनी वॉलकंपाऊंडची जाळी कापून घराच्या मागील दरवाजा उघडून गौरव ढोमने यांच्या घरात प्रवेश करून 12 हजार रु. रोख व 30 हजार रु किंमतीचा लॅपटॉप , दोन मोबाईल व सोन्याचे
दागिने या प्रमाणे एकुण 70 हजार रु. किमंतीचा ऐवजावर हात मारला. गौरव यांच्या शालकाला शौचालयत डांबून गौरवला लोखंडी
सळईने मानेला मारहाण केली त्यात तो जखमी झाला. पैसे कहाँ है असे दरडावून सांगितले पण तो काही एक बोलला नाही. या प्रकरणी एरंडोल पो. स्टे.ला भा.द.वि. कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅप्पी नावाची स्वान पथक मागविण्यात आले असता या स्वान पथकाने फिर्यादीचे घरापासून धरंणगाव रस्त्यापर्यंत मार्ग दाखविला. पो.नि. अरुण हजारे व पी.एस.आय.प्रदीप चांदोलकर हे तपास करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.