एमटीएस परीक्षेत तालुक्यातुन ज्ञानेंद्र पाटील पाचवा

0

चोपडा-
महाराष्ट्र्र टेलेंट सर्च या परीक्षेत चोपडा तालुक्यातील इयत्ता तिसरी च्या स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असुन या निकालात चोपडा बोरोले नगर मधील रहिवाशी असलेला ज्ञानेंद्र प्रवीण पाटील याला 300 पैकी 206 मार्कस मिळाले असून तो तालुक्यातून पाचवा आणि शारदा क्लासेस मधून दुसरा क्रमांकाने पास झाला आहे.तर किरण क्लासेस चे संचालक किरण पाटील यांचे चिरंजीव आयुष किरण पाटील हा देखील क्लास मध्ये नववा आला आहे.
त्याच्या या निवडीबद्दल त्याचे स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक मंगीलाल बारेला,अभिषेक शुक्ल,शारदा क्लासेस चे संचालक नंदकिशोर देशमुख,व पंकज विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील व शिक्षकांनी त्याचे कौतुक केले आहे.ज्ञानेंद्र पाटील हा जळगाव जिल्हा दोडे गुर्जर संस्थानचे संचालक प्रवीण रमेश पाटील,व भाजप महिला आघाडीच्या माजी उपाध्यक्षा अलका पाटील यांचे चिरंजीव तर जेष्ठ कवी रमेश जे पाटील यांचा नातू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.