एरंडोल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदाची सूत्रे भाऊसाहेब आकलाडे यांनी स्विकारली

0

एरंडोल -प्रतिनिधी – एरंडोल सामान्य प्रशासन जि.प.जळगाव उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब शिवाजी आकलाडे यांची एरंडोल येथे पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर बदली झाली आहे.आकलाडे यांनी ११ फेब्रुवारी मंगळवार रोजी प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचे कडून कामकाजाची सूत्रे हाती घेतली.जवळपास आठ महिन्या पासुन एरंडोल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणुन मंजुश्री गायकवाड यांच्याकडे पदभार होता.

आकलाडे यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी एरंडोल पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक अजित कुरकुटे,कक्षा अधिकारी व्ही.बी.चव्हाण,सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र मराठे,विस्ताराधिकारी रविंद्र सफकाळे इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.