एका जिनिंगला ८० ते ९० वाहने मोजण्याची परवानगी द्यावी : अमोल पाटील

0

पारोळा (प्रतिनिधी) : जवळपास अर्धा मे संपत आला असून लवकरच पावसाळा सुरू होणार असून अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या कापसाची मोजणी बाकी आहे. त्यामुळे दररोज ८० ते ९० वाहने मोजण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पणन महासंघाकडे पत्र पाठवून पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी केली आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने २७ एप्रिल पासुन कापुस मोजणी ला सुरूवात झाली असून आता पर्यंत ७२०० शेतकऱ्यांनी नोदणी केली असुन त्यात  दि, १३ मे पर्यंत १४६३ शेतकऱ्यांचा कापुस मोजला गेला असुन ५७३७ शेतकऱ्यांचा कापुस मोजणे बाकी आहे. ३१ मे पर्यंत एवढा कापुस मोजणे शक्य नाही म्हणून तालुक्यातील रोहीत जिंनिग ला पणन महासंघाची परवानगी असुन, त्यामुळे या जिनिंग ला ही पारोळा येथे कापुस मोजणी ची परवानगी द्यावी व दररोज ८०ते ९०वाहने मोजण्या यावेत, जेणेकरून शेतकरी हे कापुस विक्री पासुन वंचित राहणार नाहीत. तसेच शनिवार व रविवार जी सुट्टी दिली आहे त्यादिवशी ही कापुस मोजणी चालू ठेवावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

सध्या बाजार समिती दररोज ११२ टोकन देत आहे म्हणजे च प्रत्येकी ५६ टोकन जिंनिग असुन मात्र ग्रेडर दिवसाला फक्त ५५ते ६० मोजतात त्यामुळे जिनिंग च्या बाहेर शेतकऱ्यांचा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.  ग्रेडर हे शेतकऱ्यांना बुध्दीपुरस्कर त्रास देत आहेत. यांच्या वागणुकीमुळे शेतकऱी अडचणी त सापडले आहेत.
अमोल पाटील
  सभापती कृ,उ, बाजार समिती पारोळा

Leave A Reply

Your email address will not be published.