कोरोना पॉझिटिव्ह इसमाच्या संपर्कातील ४० व्यक्तींना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू

0

भडगाव (प्रतिनिधी) :  दि १६ रोजी गावातील सय्यद वाडा भागातील ६५ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या ४० व्यक्तींना क्वारंटाईन करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरू होते. यापूर्वी ही याच भागातील दत्तमठी गल्लीतील एकाच कुटुंबातील ५, तालुक्यातील निंभोरा येथील २ व्यक्तींना कोरोना आढळून आला होता. त्यामुळे भडगाव येथील कोरोना बाधितांची एकूण संख्या ८ झाली असून यात एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ७ व्यक्तींवर उपचार सुरू आहे.

भडगाव येथे आज शनिवारी रोजी सैय्यद वाडा भागातील ६५ वर्षीय प्रौढाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे याभागात रुग्णाच्या प्रथम संपर्कात आलेल्या एकूण ४० व्यक्तींची तातडीने यादि बनविण्याचे काम सुरू होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या या प्रौढ व्यक्तीने येथील एका खाजगी दवाखान्यात जाऊन दि ९ रोजी तपासणी करुन उपचार घेतला होता. त्यांनी उपचार केलेले व या रुग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर व स्टाफ आशा एकूण ४० व्यक्तींचे स्वॅप घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. तसेच तातडीने आरोग्य सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती ही दिली. यापूर्वी दत्तमठी गल्ली भागाला कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्या मुळे सील करण्यात आले होते. त्याला लागूनच हा भाग असल्याने प्रशासनाला आज येथे वेगळे भाग सील करण्याची गरज भासली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.