उपसा जलसिंचन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे गुरुकुंज येथे राष्ट्रसंतांच्या महा समाधीसमोर अमरण उपोषण

0

 अमरावती (प्रतिनिधी) : अमरावति जिल्ह्यात येणार्‍या तिवसा तालुक्यातील कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला. सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी मोझरी उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यात आली. परंतु या योजनेचा काही गावातील शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याने .5 गावातील शेतकरी 5 एप्रिल 2021 पासून लढा संघटनेच्या नेतृत्वात गुरुकुंज मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महा समाधीसमोर आमरण उपोषणास बसले आहे.

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेचे अनेक गावातील कोरडवाहू शेती असलेल्या भागाला पाणीच पोहोचविले नाही. ज्या भागात अप्पर वर्धा धरणाच्या उजव्या मुख्य कालव्यातून शेतीला पाणी मिळते .त्याच भागाला परत पाणी देण्याचे काम या योजनेतून होत आहे. कोरडवाहू शेती असलेल्या भागात या योजनेचे पाणी मिळणे आवश्यक होते . परंतु तिवसा तालुक्यातील वर्‍हा , माळेगाव, सालोरा, कवाड गव्हाण , मालधूर , शेंदोळा बुद्रुक , आदि गावातील मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतीच्या भागाला या योजनेचे पाणी पोहोचले नाही . म्हणून लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख व वर्‍हा येथील मुरलीधर मदनकर आणि 5 गावातील शेतकरी . 5 एप्रिल पासून गुरुकुंज येथे. आमरण उपोषणास बसले आहेत . जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.

यावेळी उपोषणकर्त्यांना अमरावती जिल्हा परिषद सदस्या गौरीताई संजय देशमुख यांनी भेट दिली . शेतकऱ्यांच्या या उपोषणाला लढा संघटनेचे संजय देशमुख , मुरलीधर मदनकर, अंकुश गायकवाड, योगेश भुसारी , संदीप राघोर्ते , नीलेश राऊत , सचिन थोटे , विजय सपाटे, मंगेश ठाकूर, मोझरी चे सरपंच सुरेंद्र भिवगडे , धोत्रा येथील सरपंच भूषण गाठे, कपिल उमप , प्रवीण हटवार , आकाश देशमुख , शरद बोरकर, निलेश धांडे , अक्षय लोखंडे, राजू निघोट , अमोल वनवे , आदी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.