उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेप

0

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपाचा निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. ही शिक्षा ठोठावताना न्यायालयाने सेंगर याला पीडितेला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत.

उन्नाव येथे २०१७मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात कुलदीप सिंह सेंगरला न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी भादंवि ३७६, पॉक्सो कायद्यातील कलम ५ (सी) अंतर्गत दोषी ठरवलं होतं. यावेळी १९ डिसेंबरला शिक्षेवर सुनावणी करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.