महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला !

0

नागपूर :  महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. येत्या २३ किंवा २४ डिसेंबरला महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशी शी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. शिवसेनेचे 10, राष्ट्रवादीचे 11 तर काँग्रेसचे 8 मंत्री शपथ घेणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 अशा 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी सहा मंत्र्यांचं तात्पुरतं खातेवाटप 12 डिसेंबरला जाहीर झालं. या ६ मंत्र्यांवरच सर्व खात्याचा भार आहे. एका-एका मंत्र्यांकडे सात-आठ खाती आहेत. त्यामुळे आता तीनही पक्षाच्या अन्य नेत्यांना मंत्रिपदं देऊन, ठाकरे सरकार पहिला विस्तार करणार आहे.  या विस्तारात काही खात्यांची आदलाबदल होऊ शकते, असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ‘पीटीआय’ला सांगितलं.

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेमकी किती मंत्रिपदं, याचा फॉर्म्युला अधिकृतरित्या कोणत्याही पक्षाने सांगितलेला नाही. मात्र खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 13 आणि काँग्रेसकडे 12 खाती आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना 10, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीचे 11 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ही नावं रविवारी निश्चित होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.