उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

0

मुंबई : मराठा क्रांती मोर्चासंदर्भात सामना दैनिकात प्रकाशित केलेल्या एका व्यंगचित्रा प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळच्या पुसद न्यायालयानं वॉरंट बजावण्यात आलेत. व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि प्रसिद्धक राजेंद्र भागवत यांच्‍याविरुद्धही वॉरंट जारी करण्यात आलंय.

मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधाने २०१६ मध्ये संपूर्ण राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. याचसंदर्भात २५ सप्टेंबर २०१६ रोजी दै. ‘सामना’ या वृत्तपत्राने ‘विराट मुका मोर्चा’ या शीर्षकाखाली व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. तसेच शहीद सैनिकांबाबत ‘ते डेंग्यूच्या हल्लात शहीद झाले, सीमेवर नाही’ असे संबोधले होते. त्यावरून येथील अ‍ॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी २७ सप्टेंबर २०१६ ला पुसद न्यायालयात बदनामीबाबत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात ११ मार्चला समन्स बजावून २२ एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट बजावलंय. सुनावणीदरम्यान, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत आणि इतर आरोपी कोर्टासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे कोर्टानं त्यांच्याविरुद्ध समन्सही धाडले. त्यानंतर आता न्यायालयानं आरोपींविरुद्ध १५ हजार रुपयांचं बेलेबल वॉरंट जारी केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.