उदयनराजे भोसले आज खासदारकीचा राजीनामा देणार!

0

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे आज खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे रात्री आठ वाजता राजीनामा सादर करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदयनराजे दिल्लीला रवाना होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला उदयनराजेंबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. खासदारकीचा आज राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांचा उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्य उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी माहिती आहे. तसंच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत ते सहभागी होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.