उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा

0

जळगाव : ढगाळ वातावरणामुळे तापमानातदेखील चढ उतार नोंदविण्यात येत असून, गुरुवारी मुंबईसह आसपासच्या परिसरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. विशेषत: मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात आली असून, बुधवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले असून, देशभरातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे.

उत्तरेकडील थंड वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे; यांचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हयांत मेघगर्जनेसह गारपीट होईल. ११, १२ आणि १३ जानेवारी धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्हयांना इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली.

दुसरीकडे राज्याच्या वातावरणातही उल्लेखनीय बदल होत असून, उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा देण्यात आला असतानाच ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्राच्या कमाल तापमानात घट होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि पालघर येथील कमाल तापमान २४ ते २६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

दरम्यान, बुधवारी मुंबईत नोंदविण्यात आलेले ३६ अंश सेल्सिअस हे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी अधिक होते. परिणामी कधी थंडी तर कधी ऊबदार असे वातावरणात बदल होत असून, हाच कित्ता आणखी दोन दिवस गिरवला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.