उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाने पुन्हा हाहा:कार ; आठ जणांचा मृत्यू, शेकडो अडकल्याची भीती

0

देहरादून : उत्तरखंडच्या चामोलीत पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. भारत-चीन सीमेजवळ सुमना क्षेत्रात आयटीबीपीच्या बटालियन पोस्टजवळ हिमस्खलन झालं. ही दुर्घटना शुक्रवारी (23 एप्रिल) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराला या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. हिमस्खलनामुळे अनेक लोक मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी आतापर्यंत 430 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. तर अजूनही 425 ते 430 लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

भारतीय लष्कराचं अनेक तासांपासून बचावकार्य सुरु आहे. लष्कराच्या माहितीनुसार सुराई ठोसा येथून मलारी क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर हिमस्खलन झालं आहे. बचावकार्यादरम्यान आज सकाळी साडेसात वाजता दोन मृतदेह जवानांना सापडले. त्यानंतर 9 ते 10 वाजेदरम्यान सहा मृतदेह सापडले. दुसरीकडे जखमींना तातडीने वायूसेनेच्या हेलिकॉप्टद्वारे जोशीमठे येथील सेनेच्या रुग्णालयात नेलं जात आहे.

सलग चार दिवसांपासून हिमवृष्टी सुरु

संबंधित दुर्घटना ज्या भागात घडली त्या भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून लगातार मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते तुटले आहेत. घटनास्थळापासून अवघ्या काही ठिकाणावर जवानांचे कॅम्प आहेत. जवान रस्ते बनवायचं काम करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.