उतावळी-बहूळा नदिजोड प्रकल्पातील जमिन संपादनासाठी महत्त्वपूर्ण बैठक

0

– शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळण्याच्या हालचालींना वेग

पाचोरा –  पाचोरा तालुक्यातील, सांगवी, साजगाव, व बिल्दी येथील शेतकऱ्यांची गेल्या १७ ते अठरा वर्षांपासून उतावळी ते बहुळा नदिजोड प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जमिन अडकून पडली असून जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा साधा भाडेपट्टाही मिळालेला नसल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. यातील काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक शेतकरी वृद्धावस्थेत जीवन जगत असून या शेतकऱ्यांना अनेकदा औषध पाण्यासाठीही पैसा राहत नाही. शेतकऱ्यांना नाइलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागली. मात्र तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी नुकताच विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरल्याने अखेर शासनाला जाग येवून शेतकऱ्यां प्रती आस्था असलेले उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी तातडीने पाटबांधारे विभागाचे उपविभागीय अभियंता जयंत महाजन, शाखा अभियंता वनखंडे यांची भूसंपादना बाबत बैठक घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना १५ वर्षानंतर का होईना शेतीचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाचोरा तालुक्यातील स्व. माजी आमदार आर. ओ. (तात्या) पाटील सन – २००९ मधे आमदार किशोर तात्कालीन जिल्हाधिकारी विजय शिंघल यांनी सार्वेपिंप्री प्रकल्पाचे पाणी वाडी नं दोन पाझर तलाव आणून ते पाणी इंद्रायणी नदीद्वारे बहुळा प्रकल्पात आणणे व हिवरा प्रकल्पाच्या ऊजव्या कालव्यातून पाणी आर्वे प्रकल्पात आणून ते इंद्रायणीच्या पात्रात सोडून बहूळा प्रकल्पात आणणे व उतावळी नदिचे पावसाळ्यात धो – धो वाहून जाणारे पाणी बहुळात आणण्याच्या कामास सुरुवात केली होती. दरम्यान साजगांव येथील काही शेतकऱ्यांनी कामास जमिनीचा अगोदर मोबदला द्या या मागण्यासाठी कामास मज्जाव केला होता. त्यामुळे काम बंद पडले होते मात्र सांगवी येथील शेतकऱ्यांची जमिन ताब्यात घेऊन त्याच वेळी पाटचारीचे काम पूर्ण करण्यात आले होते. दरम्यान येथील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला काय पण साधा भाडेपट्टाही मिळालेला नाही मात्र जमिन अडकून पडल्याने शेत्र कमी होऊन शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.

याबाबत आमदार किशोर पाटील यांनी दखल घेऊन विधानसभेत प्रश्न मांडून तो सोडवून घेतला. उतावळी बहूळा नदिजोड प्रकल्पात सांगवी ते बिल्दि शिवारा पर्यंत ३ हजार ३०० मिटर अंतराचे काम असून सांगवी शिवारातील ६५० मिटर व ५५० मिटर काम पूर्ण झालेले आहे. साजगाव शिवारातील शेतऱ्यांनी भुयारी मार्ग तयार करून काम सुरू करण्यास संमती दर्शवली असल्याने उतावळीचे पुराद्वारे वाहून जाणारे ६० टक्के पाणी पाटचारी द्वारे बहूळात तर ४० टक्के पाणी नदी मार्गे खेडगाव (नंदीचे) मार्गे बहूळा नदी पात्रात जाणार आहे. शासनाकडून नदीजोड प्रकल्पाच्या हेडवर निधी उपलब्ध झाला असून प्रस्तावा नूसार शासकिय दराने अंदाजपत्रक तयार करून शेतकऱ्या़ंच्या शेतीच्या मोबदला व भाडेपट्टा मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामूळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.