उज्ज्वल फेस्टा मध्ये प.वि.पाटील विद्यालयाने पटकावले प्रथम पारितोषिक

0

जळगाव, दि, ११ –

उज्ज्वल इंटरनॅशनल स्कुल जळगाव तर्फे आयोजित उज्जल फेस्टा या महोत्सवात केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाने समूह नृत्यामध्ये आपल्या बहारदार नृत्याने पहिला क्रमांक मिळवत जल्लोष केला.
सदर नृत्यामध्ये शिवानी सुधीर वाणी , लावण्या महेश तायडे ,रिया गोविंदा रायचंदे, अक्षरा पराग सरोदे , मेघा जितेंद्र वाणी, लावण्या सुनील चौधरी , यामिनी जीवन चौधरी प्रतीक्षा सचिन चौधरी हे विद्यार्थ्यी सहभागी झाले असून त्यांनी एकविरा आई तू डोंगरावरी …कोळीवाड्याची शान या गीतांवर सुंदर नृत्य सादर केले.
विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्या अनघा गगदाने , मानसी भदादे तसेच कामिनी धांडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांचे नृत्य पालक महेश तायडे यांनी शिकवले तर यशस्वीतेसाठी इंदू चौधरी , चित्रलेखा गुरव , आर.व्ही.पाटील ,सुधीर वाणी आदींनी परिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्या.रेखा पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.