चाळीसगावात दीड लाखांचे दागिने लंपास

0

चाळीसगाव,दि.11 –
दागिन्यांना पॉलीश करून देतो असे सांगत दोघा भामट्यांनी वृद्धेचा विश्वास संपादन करून सुमारे दीड लाख रूपयांचे दागिणे लंपास केल्याची घटना शहरात नेताजी चौकातील आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच तरुणांनी शोध घेऊन एका भामट्यास धुळे रस्त्यावर पकडून शहर पोलीसांच्या ताब्यात दिले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील नेताजी चौकातील गवळीवाडा भागातील कुसुम पाठक या वृद्ध महिला आज सकाळी अकराच्या सुमारास घराबाहेर ओट्यावर भाजी असतांना दोन भामटे तेथे आले व त्यांनी आम्ही पितळी भांड्यांना पॉलीश करून देतो असे सांगितले.पाठक यांनी त्यांच्या अमिषाला बळी पडून भांडी पॉलीश करण्यासाठी दिल्या. त्यावेळी या भामट्यांनी आम्ही सोन्याचे दांगिनेही पॉलीश करतो असे सांगितले व गोड बोलून आजीबाईंकडून 22 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या व 20 ग्रॅम सोन्याची पोत सुमारे दीड लाखाचे दागिने पॉलीस करण्यासाठी घेतले. यावेळी आजीबाईंच्या सुनबाई घरात होत्या. सोन्याचे दागिने पॉलीश करण्याचा बहाणा करीत ते एका तांब्यात टाकल्याचे भासवत त्यात पाणी व हळद टाकून ते गरम टाकण्यासाठी आजीबाईंकडे दिले. आम्ही शेजारी जावून येतो असे सांगत त्यांनी तेथून काढता पाय घेतला. आजीबाईंनी घरात जावून ताब्यांतील पाणी व त्या बाहेर ओट्यावर आल्या असता ते दोघे भामटे तेथे दिसले नाही. त्यांनी घरातील सुनबाई व मुलाला हा प्रकार सांगितला. शेजारी हा प्रकार कळाल्यानंतर परिसरातील तरुणांनी लगेच या भामट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोघ घेता घेता त्यापैकी एक भामट्ा धुळे रस्त्यावरील पुन्शी पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. त्याला तरुणांनी चांगलाच देत शहर पोलीसांच्या हवाली केले. याप्रकरणी योगिता पाठक यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे कळते.
ंगंडवणारी टोळी
दरम्यान शहरात पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने वृद्ध तसेच भोळ्या भाबड्या महिलांना गंडविण्याचा प्रकार यापूर्वीही शहरात अनेक वेळा घडला आहे. शहरात पुरुष मंडळी दिवसभर कामात गर्क असल्याची संधी साधत कॉलनी परिसरात भामटे फिरतात पॉलीशच्या नावाखाली सोन्याचे दागिने लंपास करतात. शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हेही दाखल झाले आहेत. शहर व परिसरात अधुन मधून अशी टोळी संधी शोधत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.