उच्च न्यायालयातील याचिकांच्या सुनावणी प्रकरणी अनिमितता – दलित पँथरचे आंदोलन

0

मुंबई: मा. मुंबई उच्च न्यायालयातील याचिकांच्या सुनावण्याच्या अनियमिततेबाबत दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रवक्ता राजेश सोनवणे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जगदिश इंगळे, प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले, मुंबई प्रदेश अध्यक्ष रोहित भंडारे, भाई बन्सवाल, शिवराम भुतेडिया यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे दि. १० नोव्हेंबर २०२१ पासून बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार न्या. कचरे यांनी शिष्टमंडळाला भेट देऊन कायदेशीर चर्चा केली. त्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे.

दलित पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या सुनावणी प्रकरणी होत असलेल्या अनिमितताबाबत चौकशीकरीता राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रवक्ता राजेश सोनवणे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जगदिश इंगळे, प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले, मुंबई प्रदेश अध्यक्ष रोहित भंडारे, भाई बन्सवाल, शिवराम भुतेडिया यांनी आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.

दलित पँथर संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी मा. मुंबई उच्च न्यायालयात सी.आर.पी.सी. ४८२ अंतर्गत दिनांक २९.०९.२०२१ रोजी क्र. एपीएल / ७६७/२०२१ ही दाखल केलेली याचिका सुनावणीस न येता नंतर दिनांक २०.१०.२०२१ रोजी आर्यन शाहरुख खान यांचे क्रिमीनल बेल अप्लीकेशन क्र. ३६२४/२०२१ ही दिनांक २६.१०.२०२१ रोजी सुनावणीला आल्याने या प्रकरणाची चौकशी होण्याकरीता दलित पँथर सामाजिक संघटनेतर्फे आझाद मैदान, मुंबई दिनांक १० नोव्हेंबर २०२१ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याबाबतचे निवेदन राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी, मा. मुख्य न्यायमुर्ती मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, मा. रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई तसेच मा. पोलीस आयुक्त, मुंबई यांना तक्रारी निवेदन सादर करण्यात आले होते. या आंदोलनात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ. कविताताई भोंडे, राज्य सरचिटणीस सुमनताई अहिरे, मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा सना कुरेशी, मुंबई प्रदेश अध्यक्ष रोहित भंडारे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष शिवराव भुतेडिया, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अर्जुन तायडे, मुंबई प्रदेश संघटक शांतीलाल राठौड़, कल्पना सुर्यवंशी, शाम पेगातर, भगवान मकवाना, मनोज पवार, सतिश शहा, रवीभाई, सागरभाई, हरिष कांबळे, तुषार राठोड, आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.