इमारतीला भीषण आग.. (व्हिडीओ)

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबईतील लालबाग  परिसरात इमारतीला भीषण आग लागली आहे. रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली आहे. लोअर परिसरातील अविघ्न पार्क या इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेत काही नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात दिसत आहेत.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

लाईव्ह व्हिडीओ…..👇 

19व्या मजल्यावर लागलेली ही आग आता इमारतीच्या इतर मजल्यांवर सुद्धा पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमी व्यक्तीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर

धुरामध्ये 2 जण अडकल्याची माहिती मिळतेय. लेवल 4 ची आग आहे. सिक्युरिटी कर्मचाऱ्यांकडे 15 मिनिटे होती. राम तिवारी नामक व्यक्तीचे जीव वाचवू शकले असते. प्रसंगावधान राखत गाद्या घालून, चादरी लावल्या असत्या तर त्याला वाचवता आलं असतं. सोसायटची वॉटर सिस्टम चालू नव्हती. मोठी हायप्रोफाईल सोसायटी आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा बसवली आहे मात्र ती चालू नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कुठल्याही अधिकृतवाल्यांना आम्ही वाचवणार नाही. इथल्या मॅनेजमेंट आणि फायर सिक्युरिटीवर कारवाई होणार असे महापौरांनी स्पष्ट केले.

आगीत किती लोक जखमी झाले याची अद्याप माहिती मिळाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच दहाव्या मिनिटाला आम्ही पोहोचलो आहे. इथे एक व्यक्ती लटकत होती. ही अविघ्न पार्क म्हणजे फार मोठी हायप्रोफाईल सोसायटी आहे. आणि हायप्रोफाईल सोसायटीमध्ये 200 च्या वर सिक्युरिटी गार्ड आणि सुरक्षा कर्मचारी आहेत. तो व्यक्ती हात पकडून वर लटकत होता, त्याला वाचवण्यासाठी ट्रेनिंग पाहिजे होतं ते मला दिसलं नाही. त्यांनी लगेच गाद्या घातल्या असत्या, लगेच मोठ्या प्रमाणावर चादरी घातल्या असत्या त्याला कँच करण्यासाठी तर त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्जुरी झाली नसती, असेही महापौरांनी सांगितले.

हात सुटून रहिवासी थेट खाली कोसळला

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी तो उंचावरुन खाली पडला.

इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना एक जण इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्याच्या नादात हात सुटून तो रहिवासी थेट खाली कोसळल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्ती जखमी झाल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं. मात्र त्याच्याविषयी अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही

नेमकं घडलं तरी काय ?

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.