इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का?

0

मुंबई | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? असा सवाल केंद्राला केला.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. याबाबत माझं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं आहे आणि त्यांनी तुमचा फोन ठेवताच संबंधिक अधिकाऱ्यांशी बोलून याबाबत योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश देतो”, असं सांगितल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली.

मुंबई ही आर्थिक राजधानी आणि व्यापाराचे केंद्र आहे. औद्योगिकदृष्ट्याही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत बराच मोठा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रुग्णांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचे वाटप करताना प्रत्यक्ष रुग्णसंख्या हा निकष न ठेवता प्रति दक्षलक्ष रुग्णांचे प्रमाण हे परिमाण वापरले पाहिजे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.