इटली येथील आंतराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात सचिन मुसळे यांच्या चित्राची निवड

0

जळगाव –
येथील युवा चित्रकार सचिन मुसळे यांच्या खप हेि षेी ीेोीीेुं हे शेतकर्‍याचे उद्याचे स्वप्न प्रतिबिंबित करणार्‍या जलरंगातील चित्राची निवड फॅब्रियानो एकविरेलो इटली येथे झाली आहे. या चित्रात एक शेतकरी त्याच्या बैलांसोबत नांगरणी करीतांना दाखवण्यात आलेला आहे. या चित्रातील हिरव्या रंगाची पार्श्वभुमी हेच ह्या चित्राचे वेगळेपण आहे त्या शेतकर्‍याला आपले उद्याचे स्वप्न नक्कीच सफल होईल ही आशा त्यात जाणवते. त्यातील पार्श्व भूमीचा आल्हाददायक वातावरणाचा परिणाम ज्या पद्धतीने रंगवण्यात आलेला आहे ते बघून मुसळे यांचे जलरंगातील प्रभुत्व स्पष्ट जाणवते. ही संस्था गेल्या दहा वर्षापासून वॉटर कलर मध्ये काम करणार्‍या चित्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चित्र प्रदर्शन आयोजित करत असते व चित्रकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. सचिन मुसळे गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेच्या प्रवेशासाठी प्रयत्न करीत होते.या प्रदर्शनात भारतातुन ख्यातनाम चित्रकार मिलिंद मुळीक, प्रफुल्ल सावंत, संजय देसाई, विक्रांत शितोळे यांच्याही कलाकृतींचा समावेश आहे .याआधी सचिन मुसळे यांनी पेन्सिल्व्हेनिया, आय डब्लू एस अल्बेनिया, सँडीगो वॉटर कलर आर्ट सोसायटी, या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवून आपल्या चित्रांची वाहवाह मिळवली आहे. सचिन मुसळे यांची निवड झाल्याबद्दल कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.