इंधन दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले ; आज पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या दरात झाली वाढ

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांची इंधन दरवाढ सुरूच आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाने तीन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठल्यानंतर कंपन्यांसाठी इंधन आयात प्रचंड खर्चिक बनली आहे. परिणामी ही दरवाढ ग्राहकांवर लादण्याचा प्रकार सुरु आहे. दरम्यान, आज शुक्रवारी पुन्हा पेट्रोलचे दर 23 ते 27 पैसे तर डीझेल प्रतिलिटर 27-30 पैशांनी वाढले आहेत. एक दिवसआड पेट्रोलियम कंपन्या दरवाढीचा शॉक देत आहेत.इंधन दरवाढीने ग्राहकांचे कंबरडे मोडले असून देशभरात सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.

आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०३.०८ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.९३ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.१४ रुपये भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९६.८४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०५ रुपयांवर गेला आहे. तर प्रीमियम पेट्रोल १०८.६७ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९६.३५ रुपये आहे. देशात सर्वात महाग डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.

आज कंपन्यांनी डिझेलमध्ये देखील २८ पैशांची वाढ केली आहे. यामुळे आज मुंबईत डिझेलचा भाव ९५.१४ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८७.६९ रुपये आहे. चेन्नईत ९२.३१ रुपये आणि कोलकात्यात ९०.५४ रुपये डिझेलचा भाव आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.