मुक्ताईनगरला कोरोना ओसरत्या काळात सूध्दा होमगार्ड चोखपणे कर्तव्य बजावताय

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :  जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोरोना रूग्ण संख्या कमी झाली आहे मुक्ताईनगर येथील सुध्दा आटोक्यात आली आहे तरी देखील पोलीस व होमगार्ड कर्मचारी बांधव हे परीवर्तन चौक,बस स्थानक,व गावात दिलेल्या पाईटवर ,हायवे चौफुलीवर,आपली ड्युटी चोवीस तास चोखपणे बजावत असुन कर्तव्य पार पाडत आहे.

मुक्ताईनगर बस स्थानक परिसरात बसेस सुरू झाली असून गर्दी वाढली आहे म्हणून कोरोना रूग्ण संख्या वाढु‌नये म्हणून होमगार्ड ‌बाळु मेढे, महिला होमगार्ड कल्पना तायडे, सुनिता भोई ,हे प्रवासी यांना सोशल डिस्टन ,पाळा तोंडाला मास लावा असे आवाहन करून कर्तव्य चोख पुणे बजावत आहेत.म्हणुनच त्यांची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते सेवा निवृत्त बॅंक मॅनेजर आयु.एन.जी शेजोळे, माजी पोलीस पाटील मोहन मेंढे ,व प्रवासी बांधव यांनी होमगार्ड यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अभिनंदन केले

Leave A Reply

Your email address will not be published.