इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

0

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

काय म्हटले आहे निवेदनात

केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या नरडीचा घोट घेण्याचा विडाच उचललेला असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची पेट्रोल व डिझेलच्या भावेची दरवाढ केली आहे. भारतातल्या गोरगरीब जनतेच्या दुःखाचे केंद्र सरकारचे काही घेणे देणे नाही. याबाबतचा तीव्र निषेध म्हणून आज ११ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विना पेट्रोल मोटरसायकल व चार चाकी ढकलत आणून निषेध व्यक्त करण्यात आला.

यांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, युवक शहर जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई पाटील यांच्यासह वाल्मीक पाटील, राजेश पाटील, सुनील माळी, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, वाय. एस. महाजन, ज्ञानेश्वर पाटील, वाय. आर. पाटील, विनायक पाटील, संदीप येवले, जावेद खाटीक, गौरव पाटील, सलमान खाटीक, सुशील शिंदे, अशोक पाटील, डॉ. रिजवान खाटीक, प्रवीण हटकर, उज्वल पाटील, विनायक चव्हाण, जयेश पाटील, बाळू पाटील, ममता तडवी, कमल पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.