आ.शिरीष चौधरींच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन

0

फैजपूर प्रतिनिधी: रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. शिरीष मधुकरराव चौधरी यांचा दि. २३ मे रोजी वाढदिवस आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करीत आहे. त्या निमित्ताने महाविद्यालयातर्फे रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील इ. ८, ९ व १० वी वर्गाच्या (स्टेट बोर्ड व सीबीएसई) विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन स्पर्धा परीक्षेचे दि. २२ मे २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान आयोजन केलेले आहे.

यासंदर्भात आयोजकांनी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक यांना संपर्क केलेला आहे. स्पर्धेची लिंक माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना व्हाट्सअप ला पाठिवली जाईल. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर लिंक व्हाट्सअप द्वारे शिक्षकांमार्फत इ. ८, ९ व १० वी वर्गाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी.

स्पर्धेचे नियम १) सदर स्पर्धा परीक्षा हि फक्त रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील इ. ८, ९ व १० वी वर्गाच्या (State Board व CBSE) विद्यार्थांसाठीच असणार आहे. २) प्रश्नपत्रिका हि मराठी व इंग्रजी भाषेत विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल व सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित बहुपर्यायी स्वरूपाची असेल व प्रत्येकी २ गुण असलेले एकूण ५० प्रश्न असतील. ३) परीक्षेचा कालावधी १ तासाचा (११ ते १२ वा.) असेल. ४) स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

५) स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थांना अनुक्रमे रु. ५०००, रु ३००० व रु. २००० चे बक्षीस दिले जाणार आहे व सर्व सहभागी विद्यार्थांना आॅनलाईन प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सदर स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालय प्राचार्य राजेंद्र वाघुळदे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.