आ.चंद्रकांत पाटलांची मुक्ताईनगर येथे नॅचरल ऑक्सिजन प्लांटच्या कामाची पाहणी

0

मुक्ताईनगर- येथे आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मंजूर करण्यात नॅचरल ऑक्सिजन प्लांटची कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या यावेळी उपजिल्हा रुग्णालय येथील तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे, अधीक्षक बोदवड अधिक्षक Dr मनोज चौधरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ निलेश पाटील डॉ अमित घडेकर डॉ प्रविण देशमुख तालुका सुपरवायझर अर्जुन काळे शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई शहर प्रमुख गणेश टोंगे विनोद माळी उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी प्रशांत पाटील उपस्थित होते

देशासह राज्यात माननीय मुख्यमंत्री यांनी कोरणा संसर्ग आजार रोखण्याकरिता अथांग प्रयत्न करीत आहे तसेच मुक्ताईनगर येथे देवदूत प्रमाणे आमदार चंद्रकांत पाटील हे रुग्णांच्या जीव वाचवणे करिता सर्वतोपरी प्रयत्न करीत असून राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री तसेच माननीय मंत्री गुलाबराव जी पाटील यांच्या माध्यमातून जनतेच्या सेवेकरिता व रुग्णांचा जीव वाचवणे करिता नॅचरल ऑक्सीजन प्लांट मान्यता प्राप्त केली तसेच आज उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या असून लवकरात लवकर ऑक्सीजन प्लांट नागरिकांकरिता उपलब्ध करून द्यावा जेणेकरून रुग्णांचा जीव वाचवण्यास शक्य होईल व कोरोना या संसर्गजन्य रोगाची आपण लढा देण्यास सक्षम होऊ

आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत अकरा लक्ष रुपयाचे 10000 अँटीजेन किट खरेदी करून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय तसेच बोदवड व तालुक्यातील प्राथमिक उपचार केंद्र येथे किट सुपूर्द केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.