आरोग्याची गुरुकिल्ली योग -प्राणायाम

0

चौथा अंतराष्ट्रीय योग दिन भारतासह जगातील 200 देशांमध्ये उत्साहात पार पडला. भारतात डेहराडून येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची योग दिनाला प्रमुख उपस्थिती होती. राजस्थानमधील कोटा येथे योगगुरू रामदेव बाबा यांचे
उपस्थितीत योगदिनाचा विश्‍व विक्रम झाला. सुमारे दीड ते दोन लाख लोकांनी योगदिनी योगाचा
आनंद लुटला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योग दिनाला खास
उपस्थिती होती. चार वर्षापूर्वी पहिल्या अंतरराष्ट्रीय योगदिनाला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर
योगाचा प्रचार आणि प्रसार झपाट्याने होत असल्याने प्रत्येक अंतरराष्ट्रीय दिनाला प्रतिसाद वाढतच आहे. एवढेच नव्हेज तर अंतरराष्ट्रीय दिनाव्यतिरिक्त दररोज योग करणे आता सर्वांच्याच अंगवळणी पडले आहे. त्यामुळे अंतराष्ट्रीय दिन तर एक उत्सव म्हणून उत्सहात
साजरा होतोय. आज खेड्यापाड्यात योगाविषयी जागृती निर्माण झाली आहे. योग करो निरोगी रहो हा नारा देत प्रत्येक जण योग करतो. तालुका, जिल्हा
स्तरावर आता जिकडे तिकडे योगाचे शिबीर होत असलेली दिसतील. मुक्ताईनगर तालुक्यातील बडोदा येथे एका केळींच्या शेतात निसर्गाच्या सानिध्यात बेटी बचाओ बेटी पढाओचे संचालक डॉ. राजेंद्र फडके यांनी सर्वांच्या बरोबर प्राणायाम आणि ओंकार साधनेची अनुभूती घेतली. याचा अर्थ योग प्रत्येकाच्या जीवनाचा अंग बनत आहे . लहान लहान मुले, विद्यार्थी, तरुण, तरुणी, स्त्री- पुरुष वृद्ध हे योगाकडे आकर्षित होत आहे.
निरोगी जीवनासाठी योग हा एकमेव उपाय असल्याचे योग गुरु रामदेवबाबा सांगतात आणि ते सत्य असून त्याचा अनुभव योगा करणार्‍या अनेकांना आलाय व येतोय.
अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 21 जून रोजी जळगाव शहरासह जिल्ह्यात योगाचे मोफत शिबीर घेण्यात आले. एक सप्ताहभर योगाची मोफत शिबिरे सुद्धा घेतली गेली. योगदिन सोडल्यास बाकी वर्षभर आपापल्या घरात बगिच्यामध्ये अथवा हॉलमध्ये, लाँनवर सामुहिक योगाच्या वर्गामध्ये भाग घेतले जातात. योगासाठी शहरात, खेड्यात योगशिक्षक तयार झाले आहेत. काहींनी तर
योगाची क्लासेस शुल्क घेऊन चालवतात. दिवसभर काम करणारे डॉक्टर, वकील, व्यापारी, प्रध्यापक, शिक्षक उद्योगपतीनसाठी ब्रम्हमुहर्तावर योगाच्या क्लासेस घेणार्‍याचा चरितार्थ त्यावर चालतो.फिजिओ थेरपी करणार्‍या डॉक्टरांची जी चलती होती ती रामदेवबाबाच्या विना शुल्क योग शिबिरांमुळे त्यांच्या व्यवसायात मंदी
आलेली आहे. रामदेव बाबा म्हणतात लोकांच्या शारीरिक, मानसिक, आध्यत्मिक आरोग्यासाठी योग हाच एकमेव पर्याय आहे. योग औषधांवर वैज्ञानिक आणि यशस्वी पर्याय आहे. योग हे फिल्टर आहे मनुष्याच्या शरीरावर
होणारे प्रदूषण 90 टक्के पर्यंत घटवू शकतो. योगाचे सिद्धांत कधीही बदलणार नाही.व्यवहारात मात्र बदल होत
राहतील. विविध रोगांवर इलाज करण्यासाठी रोगानुसार योग केल्यास रोग कायम स्वरूपी दुरुस्त होतात. रोगाच्या दुरुस्तीसाठी सर्वसामान्यांना अ‍ॅलोॅप्याथीचीउपचार पद्धती परवडणारी नाही.
उच्च रक्तदाब, सांधेदुखी , वातविकार , डोकेदुखी, सोरायसिस, हृद्यविकार, फफुसाची समस्या, दमा, स्पौंडेलीसीस, डोळ्यांचे विकार, कानाची समस्या इतकेच नव्हे तर कॅन्सरसारखा दुर्धर रोग सुद्धा नियमित योग प्राणायाम केले तर दुरुस्त होतो. या सर्व रोगांवर प्राणायाम योग हा जालीम उपाय आहे. परंतु योग प्राणायाम करण्यात नियमितता असणे गरजेचे आहे. फक्त नियमित निहित वेळेत फक्त सर्व प्रकारचे प्राणायाम केले तर 90 टक्के फायदा होतो. त्यात भस्रिका प्राणायाम कपाल भाती, विलोभ अनुलोभ, बाह्य प्राणायाम भ्रामरी आणि उद्गीत प्राणायाम हे प्राणायाम दररोज पाउण तास नियमित केले तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात सूर्यनमस्कार हा योगाचा प्रकार प्राचीन काळापासून आहे. परंतु योगगुरू रामदेव बाबाच्या अभियानानंतर सूर्यनमस्कार करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. सूर्यनमस्कार दिवसभर करून रेकॉर्ड करणार्‍यामध्ये आता चढाओढ लागली आहे त्यामुळे अलीकडे फिटनेस चॅलेंज ची जणू स्पर्धा लागली आहे. मध्यंतरी क्रिकेट पटू विराट कोहली यांनी नरेंद्र मोदी यांना फिटनेस चॅलेंज दिले होते तेंचालेंज स्वीकारून नरेंद्र मोदी योग करतानाचा व्होडीओ व्हायरल झाला आणि तो गाजला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मुळात योगाविषयी जागृत असून योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांचा पुढाकार महत्वाचा आहे. त्यांच्याच प्रयत्नाने चार वर्षापूर्वी 21 जून या अंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता मिळाली आणि आज जगात 21 जून हा अंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जातो हे विशेष.

Leave A Reply

Your email address will not be published.