‘आमदार आपल्या दारी’ ; आमदार किशोर पाटील यांची कजगावला भेट

0

कजगाव ता.भडगाव | प्रतिनिधी 

‘आमदार आपल्या दारी’ हि संकल्पना राबवत आमदार किशोर पाटील यांनी कजगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांच्या गाऱ्हाणी,अडीअडचणी, समस्या जाणुन घेत त्या सोडविण्यासाठी तात्काळ पाठपुरावा केला ग्रामस्थांनी काहि समस्या मांडल्या त्या सोडविण्याचे आश्वासन आ.पाटील यांनी दिले कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या नव्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व दहा बेडच्या हॉल चे उदघाटन आमदार पाटील , सभापती डॉ.अर्चना पाटील यांचे हस्ते सम्पन्न झाले.
येथील संत सावता महाराज मंदिर च्या सभागृहात आयोजित आपला ‘आमदार आपल्या दारी’  या निमित्ताने ग्रामस्थांच्या समस्या, अडीअडचणी, मागण्या या सर्वच बाबतीत ग्रामस्था समोर जाऊन त्या ऐकणे साठीच आमदार आपल्या गांवी हि संकल्पना समोर आली आज कजगाव भेटीत ग्रामस्थांनी अनेक समस्या मांडल्या यात कजगाव पोलीस मदत केंद्रावर कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती,नवीन कॉलनी भागात इलेक्ट्रिक पोल,इलेक्ट्रिक बिल अव्वाच्यासव्वा,मीटर मध्ये बिघाड केला असल्याची बतावणी करत हजार रुपयां पासुन पंचवीस तीस हजारा पर्यंत बिल दिली जात असल्याची तक्रार,कजगाव च्या आरोग्य केंद्रात चोवीस तास डॉक्टर,अंगणवाडी बांधकाम,कब्रस्थान ला भिंत सह अनेक समस्या व मागण्या नागरिकांनी मांडल्या त्या सोडविण्याचे आश्वासन देत आमदार निधीतून कजगाव साठी आतापर्यंत अंदाजे चार कोटीचे काम व एकवीस कोटींचा कजगाव रेल्वे वरील उड्डाणपूल असे पंचवीस कोटीचे काम काजगावात दिल्याचे आमदार पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले प्रसंगी कजगाव ग्रामपंचायत च्या वतीने आमदार किशोर पाटील,सभापती डॉ.अर्चना पाटील,डॉ.विशाल पाटील,जि. प.सदस्य जालिंदर चित्ते,संजय पाटील,युवराज पाटील, जे.के.पाटील,विलास पाटील,सह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कजगाव च्या प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आमदार पाटील सभापती डॉ.अर्चना पाटील यांचे हस्ते तसेच रुग्णा साठी सज्ज झालेल्या दहा बेड च्या हॉलचे उदघाटन सम्पन्न करण्यात आले प्रसंगी सरपंच वैशाली पाटील,उपसरपंच पती रफिक तांबोळी  माजी जि. प.आरोग्य सभापती एकनाथ महाजन,दिनेश पाटील,राजु चव्हाण, अनिल टेलर,अनिल महाजन सह मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.