आदिवासी बांधवांनी खावटी अनुदानाचा लाभ घ्यावा,यावल विभागाचे आवाहन

0

फैजपूर प्रतिनिधी: आदिवासी विकास विभाग यावल अंतर्गत खावटी अनुदान योजना २०२०-२१ आदिवासी,भिल्ल,तडवी या अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांना कोवीड -१९ या काळात रोजगार नसल्या कारणाने खावटी अनुदान योजने अंतर्गत शासनाकडून अर्थसाहाय्य देण्यात येत आहे.त्यासाठी लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष सर्व्हे करून फॉर्म भरण्याचे काम आदिवासी विकास विभाग यावल मार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.

फैजपूर शहरात देखील या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून क्लस्टर प्रमुख श्री.डी एस फुकटे, सचिव सुलभा प्रमोद धांडे मॅडम, राजेश निवृत्ती भारुडे, चंद्रशेखर पाटील, कमलाकर इंगळे इ.याकामी परिश्रम घेत आहेत.फैजपूर शहरातील सर्व आदिवासी बांधवांनी लवकरात लवकर फॉर्म भरून संबंधित अधिकारी,कर्मचारी आदिवासी विकास विभाग यावल यांना सहकार्य करावे असे आवाहन भाजप आदिवासी आघाडी शहराध्यक्ष रशीद बाबू तडवी, खान्देश नारीशक्ती अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिपाली चौधरी झोपे, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.