आदित्य ठाकरेंच्या दाैऱ्याने जिल्ह्यात शिवसेनेची राजकीय बाेहणी चांगली हाेणार !

0

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव :- येत्या १८ जुलै राेजी युवासेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अादित्य ठाकरे जिल्हा दाैऱ्यावर येत अाहेत. त्यांच्या राजकीय जीवनात प्रथमच ते राज्यात जन अाशिर्वाद यात्रा काढत असून या यात्रेची सुरूवात त्यांनी जळगावातून करण्याचा निर्णय घेतला अाहे. जळगाव जिल्ह्यात त्यांच्या अागमनामुळे अागामी निवडणुकीत शिवसेनेची देखील राजकीय बाेहणी चांगली हाेणार असल्याने ही यात्रा विक्रमी करण्याचा निर्धार सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केला.
अादित्य ठाकरे यांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभुमीवर येथील केमिस्ट भवानात शिवसेना, युवासेना अाणि महिला अाघाडीच्या संयुक्त बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते.

यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, अामदार किशाेर पाटील, अामदार प्रा.चंद्रकांत साेनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, माजी अामदार चिमणराव पाटील, महानगर अध्यक्ष शरद तायडे, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल दराडे,विधानसभा क्षेत्र प्रमुख महेश खैरनार, प्रकाश वाणी, मुंबईचे संकल्प श्रीवास्तव, मकरंद तक्ते, नगरसेवक सुनिल महाजन,जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, नाना महाजन,अमोल पाटील,शिवराज पाटील उपस्थित हाेते.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी अादित्य ठाकरे यांच्या दाैऱ्याच्या निमित्ताने पक्षाचे विविध उपक्रम देखील सुरू करावे, सदस्य नाेंदणी, वार्ड तेथे शाखा सारख्या उपक्रमांना प्रतिसाद वाढत असल्याचे ते म्हणाले. अागामी विधानसभा निवडणुक ताेंडावर असल्याने अापल्याला विशेष तयारी करून काही चुका टाळाव्या लागणार असल्याचे म्हटले.

जनतेच्या विश्वासाला साथ देऊन दौरा यशस्वी करा – संजयजी सावंत
जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत यांनी साेमवारी दाैऱ्याबाबत संपुर्ण नियाेजन सांगितले जाणार असल्याचे सांगितले. पक्षीय संघटनेतील उपक्रमात भगवा सप्ताह, सदस्य नाेंदणी, १७ जुलै राेजी विमा कंपनीवर काढण्यात येणारा माेर्चा याबाबत मार्गदर्शन केले. जनतेच्या विश्वासाला साथ देऊन दौरा यशस्वी करा असे निर्देश पदाधिकारी व लोकप्रतिनिधी च्या बैठकीत केले.

अामदार किशाेर पाटील यांनी दाैऱ्याची सुरूवात पाचाेऱ्यातून करण्याची मागणी केली. जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पक्षीय संघटनेच्या उपक्रमात कार्यकर्त्यांनी सहभाग वाढविण्याचे अावाहन केले. तर युवासेना संपर्क प्रमुख कुणाल दराडे यांनी जन अाशिर्वाद यात्रेची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण तर आभार जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.