आई-वडिलांची सेवा करा, चांगले यश मिळवा – संजय गरुड

0
गरुड विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
शेंदुर्णी-आचार्य गजाननराव रघुनाथ राव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी या ठिकाणी भव्य पटांगणावर विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना आपली शाळा आणि येथील सुरक्षित वातावरण सोडून तुम्ही समाजात जाऊन समाजाचे घटक होणार चारित्र्य सांभाळून चांगला माणूस म्हणून जीवन जगा हे सांगितले विद्यालयाचे उपशिक्षक डी बी मस्के यांनी विद्यालयाचे अहवाल वाचन केले तसेच इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी राणी भावसार पायल बारी वैष्णवी देसाई विद्यार्थी मनोज राठोड व बारावी मधील जितेंद्र चव्हाण नितीन जाधव अंजली धनगर या विद्यार्थ्यांनी विद्यालय या विषयी आपल्या मनातील संमिश्र भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन माननीय श्री संजय दादा गरुड यांनी दहावी आणि बारावीच्यापरीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच चांगले यश मिळवा आई-वडिलांची सेवा करा आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करा हा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले सावदा महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक व. पु. होले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला अभ्यास करा परीक्षा उत्तम प्रकारे पास करा चांगले जीवन जगा चांगले वाचन करा आणि खऱ्या अर्थाने भारताचे आधारस्तंभ व्हायचे आहे हा कानमंत्र दिला तसेच जामनेर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमोल पाटील यांनीदेखील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयाचे उपशिक्षक मोहने सर या देशाचे उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही भविष्यात देश सेवक काम करा हे सांगितले संस्थेचे सचिव सागरमल जैन यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना म्हटले की आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचे आहे हे नक्की ठरवून त्याचा योजनापूर्वक पाठपुरावा केल्यास यश नक्की प्राप्त करता येईल एकंदरीत व्यक्तिमत्व अवांतर वाचन संभाषण कौशल्य नेतृत्वगुण समयसूचकता इत्यादी गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात तेव्हा जाणीवपूर्वक स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करायला हवा ही काळाची गरज आहे असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. या निरोप समारंभाच्याकार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे सावदा महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक व. पू.होले संस्थेचे सचिव सागरमलजी जैन,  पंचायत समिती सदस्य शांताराम गुजर शेंदुर्णी नगर परिषदेच्या नगरसेविका भावना जैन पंचायत समिती सदस्य सुधाकर अण्णा बारी बोरवले सर प्राध्यापक सोनवणे उपस्थित सर्व पत्रकार बंधू विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच दहावी बारावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक के पी गरुड यांनी केले व आभार प्रदर्शन एस आर पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.