अवैध दारूविक्रीच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्ते राहुल धनगरांवर प्राणघातक हल्ला

0

पाळधी, ता.धरणगाव ( प्रतिनीधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल धनगर दारूविक्री विरुद्ध 2012 पासून लढा देत आहे. आतापर्यंत पाळधी पोलीस धरणगाव पोलीस चौकी, जिल्हाधिकारी, एस पी कार्यालय गृह मंत्रालय महाराष्ट्र राज्य,राज्यउत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन अश्या अनेक ठिकाणी तक्रार केली आहे.

तक्रारीची दखल घेत अवैध दारू विक्री बंद करण्यात आली परंतु ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे त्याचा काहीही उपयोग झाला नाही. राहुल धनगर यांना अवैध दारूविक्रते यांच्या कडून नेहमी धमक्या येत असतात आत्ताच दिनांक 7 ऑगस्ट रोजी रात्री 8-०० वाजता घराजवळ येऊन शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली. त्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते राहुल धनगर यांनी पाळधी पोलीस चौकी येथे तक्रार देण्यात आली.

यावरून दि. 9 रोजी रात्री 8:30 वा राहुल धनगर यांच्या घराजवळ येऊन त्यांना व त्यांच्या परिवारास शिवीगाळ करत मारहाण केली व आमचे दारूचा धंदा बंद केला व पोलिसांना आमचे नाव वारंवार सांगतो, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली वेळीच पाळधी पोलीस घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोचली व त्यांना लाठीचार्ज करावा लागला त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

त्यामुळे कोळीवाडा येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,तेथे पोलिस बंदोबस्त करण्यात आला.
रात्री 11:30 वाजेपर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते एकमेका विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
राहुल वासुदेव धनगर, भैया रमेश धनगर, गणेश सुरेश धनगर, सर्व रा,कोळीवाडा पाळधी बु:
किशोर प्रताप कोळी, दीपक प्रताप कोळी, सुदाम कोळी, गोपाळ सुदाम, कोळी रामचंद्र, कोळी, दीपक कोळी ,तसेच इतर 7/8 अज्ञात लोक (नाव माहीत नाही रा,कोळीवाडा पाळधी बु:) यांनी एकमेकांविरोधात पाळधी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास सपोनि हनुमंत गायकवाड सह फौज चंद्रकांत पाटील,सह फौज निलीमा हिरवाडे हे करीत आहे.

अवैध दारूविक्री बंद करावी पाळधी ग्रामस्थांची मागणी
पाळधी येथील या घटनेमुळे पुन्हा एकदा अवैध दारूचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे या अगोदर अनेक वेळा महिलांनी व नागरिकांनी पाळधी पोलीस प्रशासनास दारूविक्री बंद करावी याची मागणी केली आहे, व करत आहेत. परंतु त्याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे अनेक तरुण मुले दारूच्या व्यसनाधीन झाले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे,अनेक महिला विधवा व मुले अनाथ झाले आहे.
दारूचे दुकान सकाळी 6:00 वाजेपासून ते रात्री 11:00ते 12:00 वाजेपर्यंत चालू असतात पाळधी परिसरात अवैध दारू मिळण्याच ठिकान बस स्टँड परीसर ,स्टेशन रोड ,दोनगाव रस्ता, पाळधी खुर्द पाळधी बु: व काही टपऱ्यांवर दारू सहज मिळत असते, लॉकडाउनच्या काळातही सर्वात जास्त दारू विकण्यात आली.

सध्या शाळा व कॉलेज बंद असल्या कारणाने तरुण मुले व्यसनाधीन होता की काय याची काळजी पाल्यांना सतावत आहे. पाळधी येथील महिला व नागरिकांची दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. याकडे पोलिस प्रशासन व इतर प्रतिष्ठित नागरिकांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा जनता करू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.