अवैधरीत्या वाळू वाहतुक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरांवर कार्यवाही

0

भङगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा येथील गिरणा नदी पाञातुन अवैधरित्या वाळु वाहतुक करणार्या ३ ट्रॅक्टरांना पकडून महसुल विभागाच्या पथकाने कार्यवाही केली आहे. या ट्रॅक्टरधारकांवर दंडात्मक वसुलीची कार्यवाही करण्यात येणार आहे. या कार्यवाहीमुळे अवैधरित्या वाळु चोरी करणार्यांचे धाबे दणाणले आहे.

निंभोरा गिरणा नदी पाञामधुन अवैधरित्या होत असलेली वाळु चोरी रोखण्याबाबत निंभोरा ग्रामपंचायतीने पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, भङगाव तहसिलदार सागर ढवळे यांना लेखी पञ व तसा ठरावही दिला होता. महसुल प्रशासनामार्फत तक्रारीची दखल घेत कार्यवाहीचा बङगा उगारण्यात आला आहे. या महसुल विभागाच्या पथकातील संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार एम डी मोतीराय, लिपीक महादु कोळी आदिंनी ही कार्यवाही केली. तीनही ट्रॅक्टर  तहसिल कार्यालयात पकङुन जमा करण्यात आलेले आहेत. ही कार्यवाही  निंभोरा गावाजवळ दि. १ रोजी मध्यराञीच्या अंधारात अङीच ते तीन वाजेदरम्यान करण्यात आली.  या संबंधीत ट्रॅक्टरधारकांविरुद्ध शासन नियमानुसार दंडात्मक वसुलीची कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती भडगाव महसुल  पथकातील डी एम मोतीराय यांनी दिली.

१ एप्रील २०२१ या चालु वर्षात आतापर्यंत अवैधरित्या गौणखनिज चोरणार्या एकुण ९ वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त २ लाख रुपये दंङ वसुलीची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच महसुल प्रशासनाने वाळुचे पकङलेले एकुण ३४ वाहने जमा केलेली आहेत. संबंधीत  ३४ वाहनधारकांना दंङ वसुलीबाबत नोटीसाही देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहीती भङगाव तहसिलकार्यालयाचे लिपीक  एस एम बढे यांनी दिली. भडगाव शहरासह तालुक्यात गिरणा नदी पाञातुन राञीच्या अंधारात सर्रास वाळुचा  अनेक ट्रॅक्टरने वा बैलजोडीनीही अवैधरित्या वाळुचा उपसा होत आहे. महसुल विभागामार्फत  संबंधित वाहनधारकांवर कधी कार्यवाही होतांना दिसते.  तर कधी दुर्लक्ष होतांना दिसते. तरी महसुल प्रशासनाने अवैधरित्या  होणार्या वाळु चोरीवर कायमचा आळा बसवावा. धङक कार्यवाहीची मोहिम सुरु करावी. अशी मागणीही भडगाव शहरासह तालुक्यातील नागरीकातुन होतांना दिसत आहे.

निंभोरा ग्रामपंचायतीचे पाचोरा प्रांत व भडगाव तहसिलदारांकडे लेखी पञ व ठराव

निंभोरा ग्रामपंचायतीने भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, निंभोरा येथील गिरणा नदी पाञामधील वाळु चोरी रोखण्यात यावी. निंभोरा गावी गिरणा नदी पाञातील वाळु ही अवैधरित्या सर्रासपणे चोरी होत आहे. ही होणारी  वाळी चोरी त्वरीत रोखण्यात यावी. गावी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. नदी पाञातुन वाळु उपसा झाल्यास अजुन पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागेल. तरी प्रशासनाने त्वरीत वाळु चोरी , उपसा  रोखण्यात यावा. असेही पञात शेवटी नमुद केलेले आहे. या पञावर सरपंच दिलीप पाटील, ग्रामसेविका सुनिता चौधरी यांची सही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.