अवनी लेखराची पुन्हा कमाल; गोल्डनंतर जिंकलं आणखी एक मेडल

0

टोकयो

सध्या टोकियोमध्ये सुरु असलेल्या टोकयो पॅरालिम्पिक २०२० मध्ये १९ वर्षीय अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदकानंतर कांस्यपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. ५० मीटर्स एअर रायफल स्पर्धेत अवनीने कांस्य पदकाची कमाई केली आहे. अवनीच्या दमदार कामगिरीनंतर भारताच्या खात्यात १२ वं पदक जमा झालं आहे.

https://twitter.com/Tokyo2020hi/status/1432189690434789377?s=20

अवनी लेखरा ही पॅरालिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी पहिला महिला खेळाडू ठरली आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या. पात्रता फेरीत अवनी लेखरा ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात बारावं पदक आलं आहे.

अवनी लेखराने सोमवारी येथे टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले होतं. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

अवनी लेखरा ही राजस्थानची राजधानी जयपूरमधील आहे. अवनी११ वर्षांची असताना, तिचा अपघातात झाला होता. या अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला अर्धांगवायू झाला. अवनीला तिच्या वडिलांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी या दोन्हीमध्ये खेळांमध्ये रस दाखवला होता. पण शेवटी तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले. अवनी महिलांच्या १० मीटर एअर स्टँडिंग शूटिंगच्या एसएच१ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.