अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल

0

पहूर ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पहूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा रस्ता आडवून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुलगी सायकलेने घरी जात असतांना गावातील अक्षय अर्जून मोरे (वय २०) याने रस्ता आडवून मुलीचा विनयभंग केला. तसेच पोलीसात गेली तर मुले जमा करून मारहाण करेल अशी धमकी देखील  दिली.

याप्रकरणी पिडीत मुलीने संशयित आरोपी अक्षय मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय बनसोड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.