अम्फान चक्रीवादळ काही तासांतच घेणार रौद्र रुप ; ओडिशा आणि बंगाल हाय अलर्टवर

0

 

  मुंबई : पश्चिम बंगाल आणि ओडिशा इथे चक्रीवादळ ‘अम्फान’ चा इशारा दिला असून पुढील काही तासांत वादळ एक धोकादायक रूप धारण करू शकेल अशी भीती हवामान खात्याने व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारपर्यंत पश्चिम बंगालमध्येही हे वादळ पोहोचू शकेल.या वादळामुळे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याचा अंदाज आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरातून मध्य भागात गेल्या 6 तासांत तीव्र चक्रीवादळ ‘अम्फान’ ईशान्य दिशेकडे वाटचाल करत आहे. ही एक अतिशय गंभीर परिस्थिती आहे.

पुढील तीन दिवस बंगालच्या खाडीत प्रवेश न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जे मच्छिमार आधीच समुद्रात आहेत, त्यांना परतण्यास सांगितले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम देशातील आठ राज्यांवर जाणवू शकतो. परिणामी इथे जोरदार पाऊस आणि आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटांवरही या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाजपूर, भद्रक, बालासोर, मयूरभंज, गंजम, जगतसिंहपूर, गजपती, नयागड, कटक, केंद्रपाडा, खुर्दा आणि पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे तामिळनाडूतही ऍम्फान चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. रविवारी वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडे कोसळली तसेच मोठे नुकसानही झाले. कोईम्बतूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये झाडे कोसळल्याचे वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.