अमृत योजनेचे पाईप जाळून टाकण्याची महिलांची धमकी

0

काम खोळंबले अधिकार्‍यांची पोलीस ठाण्याकडे धाव

भुसावळ दि –
येथील सुंदर नगर भागात अमृत योजनेची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून अतिरिक्त भागातील राहणार्‍या काही महिलांनी अमृत योजनेच्या काम करणार्‍या अधिकार्‍यांना धारेवर धरून आमच्या ही भागात पाईप लाईन टाका असा हट्ट करीत पाईप लाईन न टाकल्यास जेसीबी मशीन व पाईप जाळुन टाकू असे धमकावून त्याचे काम थांबविल्याची घटना आज 3 वाजे दरम्यान दुपारी घडली.यामुळे अमृत योजनेच्या
अधिकार्‍यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली.
नगरपालिकेने भुसावळ शहराचा सर्व्हे केला असून त्याप्रमाणे अमृत योजनेचे काम सुरू आहे. ज्या प्रमाणे नकाशा तयार करण्यात आलेला आहे.त्यानुसार कामकाज सुरू आहे.सुंदर नगर या परिसरा पर्यत नगरपालिकेचे अमृत योजनेचे काम झालेले असून वाढीव एरिया मधील काही महिलांनी अमृत योजनेच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन आमच्या ही एरियामध्ये पाईप लाईन टाका आमच्याकडेही पाणी येत नाही अशी मागणी केली चर्चा सुरु असतांना चर्चेचे रूपांतर वादात झाले अधिकार्‍यांशी महिलांची तू तू मैं मैं झाली. .त्या महिलांची नगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी तुमचा एरिया नगरपालिकेच्या नकाशा प्रमाणे नसल्यामुळे तुमचा वाढीव प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.त्याची मंजुरी मिळाली की तुमच्या एरियातही अमृत योजनेची पाईप लाईन टाकली जाईल अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.त्या महिला ऐकण्याच्या परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी त्याठिकाणी जमाव करून काम बंद केले.तुमची जेसीबी मशीन जाळून टाकू असे धमकाविले यामुळे अमृत योजनेच्या अधिकार्‍यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. त्या महिलांनी आपला मोर्चा बाजारपेठ पोलीस स्टेशनकडे वळविला व ते सर्व महिला पोलीस स्टेशनला आल्या व पीएसआय निशिकांत जोशी यांची भेट घेतली.आलेल्या महिलां व अमृत योजनेचे अधिकार्‍यांच्या सोबत जोशींनी चर्चा केली.तुम्ही नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तसेच जिल्ह्यधिकारी,नगरविकास मंत्री,आमदार यांच्याकडे संपर्क साधा. पाईप लाईन टाकण्यासाठी पोलीस प्रशासन तुमची काहीही मदत करू शकत नाही अशी समजूत आलेल्या महिलांची काढली.तसेच अमृत योजनेच्या अधिकार्‍यांना काम करीत असतांना त्रास देऊ नका असेही सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.