अमळनेर मतदार संघातील मतदार यादीतील फोटो नसणारे नावे वगळणार:- तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

0

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभा मतदार संघातील अमळनेर व पारोळा तालुक्यातील 108 मतदारांची मतदार यादीत फोटो नसल्याने ती नावे वगळण्यात येणार आहेत अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिली आहे.

 

निवडणूक आयोगाच्या आदेशाने फोटो नसलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे,ज्यांचे फोटो नाहीत त्या ठिकाणच्या बी.एल.ओ, मतदान केंद्र अधिकारी यांना संबंधित व्यक्तींना फोटो देण्याचे सूचित केले आहे तरी मतदारांनी फोटो आणून द्यावेत अन्यथा त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत.

 

तसेच नावे वगळली गेल्यास फॉर्म नंबर ६ भरून पुन्हा नोंदवली जातील असे आवाहन तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.