अमळनेर नगरपालिका थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करणार ; चौकाचौकात झळकणार बॅनर

0

अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोना व लॉकडाऊन मुळे २०२०-२१ या वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत.याचा परिणाम अमळनेर नगरपरिषदेच्या अर्थचक्रावर देखिल मोठ्या प्रमाणात झालेला आहे.

याचाच भाग म्हणून नगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात धडक वसुली मोहीम राबवायला सुरवात केलेली आहे.यात अवैध नळ कनेक्शन,थकीत मालमत्ता कर,कोरोना नियमांचे उल्लंघन याद्वारे नगरपालिका उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने विक्रमी वसुली करण्याचा धडाका लावला आहे.

शहरात काही मालमत्ता थकबाकीदार आहेत त्यांना २० मार्च पर्यंत भरणा करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.विविध नोटीस द्वारे थकबाकीदारांना सूचित करण्यात आलेले आहे,थकबाकीदारांनी थकीत रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांची नावे शहरातील चौकाचौकात डिजिटल फलकावर झळकणार आहेत.

नागरपरिषदेला पाणीपट्टी,घरपट्टी, जाहिरात, अग्निशमन व इतर वेगवेगळ्या रूपाने कर जमा होत असतो यापैकी ७० ते ७५ टक्के खर्च हा मूलभूत अशा पिण्याचे पाणी,दिवाबत्ती यावर खर्च होत असतो.जमा होणारा पैसा नागरिकांच्याच सोयी सुविधांसाठी नगरपालिका प्रशासन उपयोगात आणते.शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक यांनी कराची रक्कम न भरल्याने ते थकबाकीदार आहेत,त्यांनी रक्कम न भरल्यास त्यांना डिजिटल बॅनर वर नगरपालिका प्रशासन प्रसिद्धी देणार आहे.यापासून स्वतःला वाचवायचे असल्यास थकबाकी त्वरित पालिका प्रशासनाकडे जमा करावी असे आवाहन उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी केले आहे.

मा.मुख्याधिकारी यांच्या आदेशाने थकबाकीदार तसेच चालू भरणा करणाऱ्यांना नोटीस देण्यात आलेला आहेत येत्या 20 तारखेला थकबाकीदार तसेच चालू भरणा तसेच नियमित भरणा करणारे ज्यांनी भरणा केलेला नाही त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. मागील वेळेस आमचे नाव का आले असे म्हणणारे थकबाकीदार पुष्कळ होते. तरी आपली यादी प्रसिद्ध झाल्यास नगरसेवक किंवा अध्यक्ष किंवा नगरपरिषद प्रशासन यांना दोषी ठरवू नये हे सर्वस्वी  थकबाकीदारांची  चूक आहे असे समजण्यात येईल.

– संदीप गायकवाड
उपमुख्याधिकारी
(नगरपरिषद,अमळनेर)

Leave A Reply

Your email address will not be published.