अमळनेरच्या मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाचा पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील मंगळग्रह सेवा संस्थेला राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालया तर्फे २७ रोजी पर्यटन दिनानिमित  धार्मिक क्षेत्रात पर्यटन वाढीसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल  शासनाचा  ‘ पर्यटन मित्र ‘ हा पुरस्कार नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते नासिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे देण्यात आला.

कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून सर्वच क्षेत्राला कमी – अधिक स्वरूपाचा आर्थिक फटका बसला आहे. त्याला पर्यटन क्षेत्रही अपवाद राहिले नाही. या पार्श्वभूमीवर पर्यटन वाढीला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी शासनामार्फत कृषी, धार्मिक, ऐतिहासक, सायकलिंग, ग्रामीण कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती संस्थाना पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर  पोलीस आयुक्त दीपक पांडे,उपजिल्हाधिकारी  भीमराज दराडे, प्रादेशिक व्यवस्थापक MTDC जगदीश चव्हाण,पर्यटन संचालनालयचे उपसंचालक नितीनकुमार मुंडावरे, उपअभियंता ज्ञानेश्वर पवार, ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे राजेंद्र बकरे, नितीन सोनवणे, जयेश तळेगावकर, पत्रकार रमेश पडवड आदी मान्यवर उपस्थित होते. मुंडावरे , बकरे , पडवळ व पांडे यांनी मार्गदर्शन केले. पुरस्कारार्थी म्हणून मंगळग्रह  सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांना मनोगताची संधी मिळाली. त्यांनी धार्मिक पर्यटनाचे स्वरूप , व्याप्ती व अर्थकारण विशद केले . मंगळग्रह मंदिराच्या धार्मिक पर्यटनाच्या नेत्रदीपक यशाचे गमकही त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन.पाटील,सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी,विश्वस्त अनिल अहिरराव ,डी. ए.सोनवणे तसेच कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट संजय पाटील  सेवेकरी आर.जे.पाटील, उमाकांत हिरे, राहुल पाटील, भूषण पाटील उपस्थित होते.

संस्थेला मिळाले चौथे आय एस ओ मानांकन

मंगळग्रह सेवा संस्थेला यापूर्वीच विविध प्रकारची तीन आय एस ओ मानांकने मिळाली आहेत. संस्थेने अन्न सुरक्षितता बाबत मिळविलेले चौथे मानांकन पोलीस आयुक्त दिलीप पांडे यांच्या हस्ते देण्यात आले . सदर पुरस्कार व चार आय एस ओ मानांकने मिळविणारी मंगळग्रह सेवा संस्था तथा  मंगळग्रह मंदिर राज्यात एकमेव ठरल्याने सर्वांनीच कौतुक केले .दरम्यान अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.