अमळनेरची मानसी पाटील उपजिल्हाधिकारी; राज्यात द्वितीय

0

जळगाव : जळगाव :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने गेल्या वर्षी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून यामध्ये अमळनेर तालुक्‍यातील जवखेडा या गावाची विद्यार्थिनी मानसी सुरेश पाटील हिने उपजिल्हाधिकारी पदासाठी राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये मानसी पाटील हिने राज्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच दीपस्तंभ गुरुकुल प्रकल्पात शिष्यवृत्ती परीक्षेत शिकणारी विद्यार्थिनी पिंपळगाव खुर्द (ता. भुसावळ) येथील पूनम राणे हिची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाली आहे. तिला 490 गुण मिळाले आहेत. तर धुळे येथील रुपाली गजानन शिरोळे हिची औद्योगिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ती “सकाळ’चे उपमुख्य संपादक प्रशांत कोतकर यांची भगिनी आहे. तर जळगाव येथील जीवन मोराणकर यांची तहसीलदार पदी निवड झाली आहे. ते सध्या नंदुरबार येथे उपशिक्षणाधिकारी आहेत. संगमनेर येथील अल्फा मिलिंद देशमुख यांनी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.