अमळगावातील तरुणांची केली अनोखी शिवजयंती साजरी !

0

 लोकसहभागातून व्यायामशाळेचा जिर्णोद्धार

अमळगाव ता.अमळनेर (वार्ताहर) येथे तत्कालीन आमदार. डॉ. बी एस. पाटील यांच्या निधीतून व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यात आले होते ही वास्तू येथील साहित्य पूर्णपणे मोळकळीस आले होते. ही व्यायामशाळा नूतनीकरण व्हावे व यात साहित्य मिळावे अशी मागणी गावातील लष्करी व निमलष्करी दलासाठी व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची मागणी होती.

शिवजयंतीचे औचित्य साधत गावातील विविध शासकीय सेवेत व व्यापारात कार्यरत असलेल्या युवकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या उमेद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः योगदान देत या कामासाठी लोकसहभागातून निधी देण्याचे आव्हान केले त्याला तरुणांची व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आज सायंकाळी श्री. संत गजानन महाराज व शनेश्वर देवस्थानच्या ओट्यावर शिवजयंतीच्या औचित्याने समर्थ व्यायाम शाळेच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी व्यापार मंगेश झंवर , सैन्यदलात कार्यकत असलेले उदय पाटील, वसंत वाणी , व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी निलेश हिंमतराव पाटील , यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.