अबब! अमेरिकेत कोरोनाचे ८३ हजारहून अधिक रुग्ण, १००० जणांचा मृत्यू

0

वॉशिंग्टन : जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना व्हायरसने चक्क हाहाकार माजवला आहे.  अमेरिकेत चीनपेक्षाही सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.गुरुवारी दिवसाअखेर अमेरिकेत कोरोनाने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ८३ हजार ५०७ वर गेली आहे, तर या साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा एक हजारापेक्षा जास्त झाला आहेत, अशी आकडेवारी जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाच्या कोरोना विषाणू ट्रॅकरकडून जाहीर करण्यात आली आहे. चीनपेक्षाही हा आकडा २ हजारांनी अधिक आहे. तर इटली, स्पेन आणि चीनमध्ये मृत्युमुखींचा आकडा हा अधिक आहे.

अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. हा आकडा वाढतच जाईल असा अंदाज आहे कारण दिवसेंदिवस चाचण्यांचे अहवाल समोर येत आहेत. अमेरिकेत कोरोना बाधितांचा वाढत जाणारा आकडा पाहून जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाच्या कोरोना विषाणू ट्रॅकरकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार गुरुवार अखेरपर्यंत जगभरात या विषाणूची बाधा झालेले ५ लाख २९ हजार रुग्ण आढळले तर २३ हजार ९५६ लोकांचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.