अनेर धरणातून पाणी सोडण्याची खासदारांची मागणी 

0
चोपडा;-  तालुक्यातील गणपूर, भवाळे, गलंगी, धानोरा प्र, घोडगाव, वेळोदे, कुसंबे, अनवर्दे बु, तगडी, मोहिदा, अजंतीसीम, वढोदा, विटनेर, वाळकी, शेंदनी व मालखेडा या सोळा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने अनेर धरणातून अनेर नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याबाबत चोपडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शशी देवरे, तालुका सरचिटणीस पंकज पाटील, माजी सरचिटणीस शशी पाटील व सोळा गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी आठ दिवसापूर्वी खासदार रक्षाताई यांच्या कडे मागणी केली होती. खासदार रक्षाताई खडसे यांनी जलसंपदा व वैदकीय शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून या धरणातून पाणी सोडण्याबाबतचे पत्र  जिल्हाधिकारी कार्यलयातून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहे. पुढील चार पाच दिवसात अनेर धरणातून अनेर नदीपत्रामध्ये सोडन्यात येईल.
खासदार रक्षाताई खडसे यांच्या मुळे पाणी सोडण्यात आल्यामुळे सर्व सोळा गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.