अस्थमा नियंत्रणात ठेवता येतो – डॉ.कल्पेश गांधी

0

जळगांव : अस्थमा रूग्णांना त्वरीत आराम देणारी (रिलीव्हर्स) आणि श्वसननलिकेच्या सुजेला प्रतिबंध करणारी (प्रिव्हेंटरर्स) औषधी नियमितपणे दिल्यास अस्थमा नियंत्रणात ठेवता येतो असे डॉ.कल्पेश गांधी यांनी प्रतिपादन केले.
रोटरी वेस्ट तर्फे भवरलाल आणि कांताबाई जैन ट्रस्ट यांच्या सहकार्याने जागतिक अस्थमा दिनानिमित्त भाऊंचे उद्यान येथे आयोजित जाहिर मोफत व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी वेस्टचे अध्यक्ष ऍड.सुरज जहागीर, जैन इरिगेशनचे कॅप्टन मोहन कुळकर्णी, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.आनंद दशपुत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वारंवार होणारा खोकला, कफ, चालतांना लागणारी थाप, श्वास घेतांना सिटीसारखा आवाज होणे, छाती जखडल्या सारखे वाटणे ही अस्थमाची लक्षणे डॉ.गांधी यांनी सांगून अस्थमा मध्ये श्वसन नलिकेला सुज येते आणि विविध ट्रिगर्समुळे अस्थमाचा प्रादुर्भाव वाढतो. बदलते वातावरण, ध्रुमपान, वायुप्रदुषण, धुळ, मानसिक तणाव हे विविध ट्रिगर्स आहेत असे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी या ट्रिगर्स पासून स्वत:ला दुर ठेवून घराबाहेर पडतांना हात रूमाल / मास्कचा वापर करणे, प्राणायम / योगा नियमित करणे, लसीकरण करणे यामुळे अस्थमा पासुन बचाव करता येतो असे म्हटले. व्याख्यानानंतर संदीप कोळी, फाईम खान आणि सुमित जैन यांनी इन्हेलर कसे घ्यावे यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. व्याख्यानानंतर झालेल्या मोफत तपासणी शिबीरामध्ये रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.