अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

0

मनवेल, ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

साकळी येथील एका तरुणाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघातात मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास यावल- चोपडा मार्गावरील साकळी गावापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या भारत तोलकाटयाच्या जवळ साकळी येथील राहणारा रोहीत अरूण कोळी (वय २६) हा आपल्या मोटरसायकल क्रमांक एमएच १४ जेएन २६८५ वाहनाने साकळीकडुन किनगावकडे जात असतांना एका अज्ञात वाहनाने मोटरसायकला धडक दिल्याने भीषण अपघातात गंभीर दुखापत होवुन जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली आहे.

दरम्यान मरण पावलेल्या रोहीत कोळीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन, याबाबत कैलास कोळी यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली. अपघाताची माहीती कळताच पंचायत समितीचे सदस्य दिपक अण्णा पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह साकळी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. सदरच्या अपघातात मरण पावलेला तरूण रोहीत कोळी हा अरूण कोळी यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुदैवी घटनेने परिवारावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.