अजित पवारांची ३.३० वाजता पत्रकार परिषद !

0

मुंबई: मुंबई: आगमी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राजीनाम्यानंतर तब्बल २० तास गायब राहिल्यानंतर अजित पवार मुंबईत प्रकटले. भाऊ श्रीनिवास पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्यासोबत त्यांनी शरद पवारांचं निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’ गाठलं. यावेळी सुप्रिया सुळेही चर्चेसाठी उपस्थित होत्या. दरम्यान, अजित पवार ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेमके ते या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी सांगितले की, अजित पवारांशी मी केवळ राजकीय चर्चा केली नाही. घरातील काही प्रश्नांवरही चर्चा केली. मुलांच्या लग्नाबद्दलही चर्चा झाली, असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.